“मातृत्वातून नेतृत्वाकडे”
ती चालते आहे…हळूहळू, पण ठामपणे.पोटावर हात ठेवून,जणू प्रत्येक पावलागणिक आपल्या गर्भातल्या त्या छोट्याशा जीवाला सांगत आहे..“घाबरू नकोस बाळा…आई लढते आहे.” ज्या काळात एखादी आई स्वतःची काळजी घेते,बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवते, स्वप्नं पाहते त्या काळात ही आई निवडणुकीच्या रणांगणात उतरली आहे. चार मजली इमारतींच्या पायऱ्या चढताना तिच्या पोटातल्या त्या जीवाची हालचाल कदाचित तिला थांबायला सांगत असेल,पण तिचं मन म्हणतं..“आज थांबलो,तर उद्या माझ्या बाळाला थांबावं लागेल.”रस्तोरस्ती फिरताना उन्हाचा चटका तिला जाणवत असेल,पाय दुखत असतील,थकवा शरीरात साचत असेल…पण त्या गर्भातल्या बाळासाठीच ती स्वतःशीच लढते आहे. तो छोटासा जीव अजून या जगात आला नाही,पण आईच्या हृदयातून तो सगळं अनुभवतो आहे. आईचा थकवा..आईची धडपड..आईची जिद्द..आईचं स्वप्न..ती का उतरली असेल या रणांगणात?कारण तिला माहित आहे उद्या जेव्हा हे बाळ चालायला शिकेल, तेव्हा रस्ते सुरक्षित हवेत.जेव्हा शाळेत जाईल,तेव्हा शिक्षण दर्जेदार हवं. जेव्हा मोठं होईल, तेव्हा समाज प्रामाणिक,सुरक्षित आणि समानतेचा असावा. ती केवळ स्वतःसाठी लढत नाही. ती आपल्या गर्भातल्या बाळासाठी लढते आहे. आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या मुलांसाठीही. आजपर्यंत आपण घराणेशाही पाहिली. सत्ता पिढ्यान्पिढ्या चालवत आलेले चेहरे पाहिले.वचनं ऐकली,घोषणा ऐकल्या,पण सामान्य माणसाच्या आयुष्यात फारसा बदल झालेला पाहिला नाही. आज मात्र एक वेगळं चित्र आपल्या समोर आहे.एक आई जी बाळ जन्माला घालण्याआधीच त्याच्या भविष्यासाठी लढायला उभी आहे. ती कदाचित मोठ्या भाषणात बोलणार नाही, पण तिच्या शांत संघर्षात प्रचंड ताकद आहे. ती कदाचित घोषणांनी गर्दी खेचणार नाही, पण तिच्या प्रत्येक पावलामागे एक पिढी उभी आहे. आपण म्हणतो ना…“आईसाठी सगळं करायला तयार आहोत.”आज त्या शब्दांना अर्थ देण्याची वेळ आहे.तिला जिंकवणं म्हणजे एका गर्भातल्या स्वप्नांना सुरक्षित भविष्य देणं. एका अजन्म्या बाळाला सांगणं.. “तुझी आई एकटी नव्हती..समाज तिच्या सोबत होता.” एक सुज्ञ नागरिक म्हणून,एक संवेदनशील माणूस म्हणून,आज आपली जबाबदारी आहे या आईच्या पाठीशी ठाम उभं राहण्याची. कारण जी आई आपल्या गर्भात बाळ घेऊन समाजासाठी लढते, ती केवळ निवडणूक जिंकत नाही ती इतिहास घडवते… भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रिय उमेदवार सौ. नमिताताई प्रितेश पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.स्वच्छ प्रशासन,पायाभूत सुविधा,महिलांचे सक्षमीकरण आणि तरुणांना संधी या मूल्यांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यासाठी कमळाला मत द्या. तुमचा एक मत प्रभागाच्या उज्ज्वल उद्याचा मजबूत पाया ठरेल. विकासाला साथ! #BMCElection2026

